लिपस्टिक स्वप्नांचं आणि बुरखा वास्तवाचं प्रतीक, त्याचा धर्माशी संबंध नाही!
निखळ लैंगिकतेपासून सुरुवात करत हा सिनेमा छोट्या, पण प्रत्ययकारी जागा घेत जगण्याच्या असंख्य आकांक्षा फुलताना आणि नंतर त्या पायदळी तुडवल्या जाताना दाखवतो. लिपस्टिक हे या स्वप्नांचं प्रतीक आणि परंपरेचा बुरखा हे वास्तव. याचा कोणत्याही धर्माशी काही संबंध नाही. सिनेमाची हाताळणी काहीशी तटस्थ वाटते. जितक्या निर्विकारपणे शिरीनचा नवरा तिचा उपभोग घेतो, तशाच थर्ड अँगल पर्सपेक्टिव्हने ही कहाणी सांगितली गेली आहे.......